भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतासह जगभरात साजरी होत असते. तसेच जगातील अनेक देश त्यांचा विविध प्रकारे सन्मान करत असतात. या पार्श्वभूमीवर कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया राज्याने यूनाइटेड किंगडमच्या (ब्रिटनच्या) राणी एलिज़बेथ द्वितीय यांच्या सहमतिने, 14 एप्रिल हा दिवस 'डॉ बी आर अंबेडकर समता दिन जाहीर केला होता. तो दरवर्षी आता साजरा केला जात आहे. आणि आता अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यात सुद्धा 14 एप्रिल हा दिवस 'डॉ बी आर अंबेडकर समता दिन'  जाहीर केला आहे. 

14 एप्रिल 1891 रोजी भारतात जन्मलेले डॉ. बी. आर. आंबेडकर हे “भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार" होते; स्वतंत्र भारतातील समता, न्याय, सन्मान आणि बंधुत्वाचे समर्थन करणारे ते प्रगल्भ समाजसुधारक, मानवतावादी, राष्ट्रनिमति, एक प्रख्यात घटनात्मक वकील, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, कायदा निर्माता, पर्यावरणवादी, राजकारणी आणि लाखो दलितांची मुक्तता करणारे होते; ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते.

डॉ. आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या विकासात बहुआयामी योगदान दिले आणि त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' ने सन्मानित करण्यात आले; अस्पृश्य जातीत जन्मलेले डॉ. बी. आर. आंबेडकर हे पहिले उच्चशिक्षित, राजकीयदृष्ट्या प्रभावशाली सदस्य होते ज्यांनी आयुष्यभर उपेक्षित घटकांच्या हक्कांचे समर्थन केले. त्यांनी पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. 1927 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात, आणि 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डीएससी प्राप्त केली. त्यांना कोलंबिया विद्यापीठाने 1952 मध्ये "महान समाजसुधारक आणि मानवी हक्कांचे शूर "समर्थक" म्हणून सन्मानित केले.