नारळी दुधातील पुलाव ही एक दक्षिण भारतीय डिश आहे. नारळाच्या दुधामुळे पुलावला एक मधुर चव येते आणि तो जास्त रुचकर लागतो... पाहा नारळाच्या दुधातल्या पुलावची ही खास रेसिपी

 महत्त्वाचे साहित्य

२ वाट्या तांदूळ, २ उभे चिरून ठेवलेले कांदे, २ वाट्या नारळाचा रस ( १ वाटी खोबऱ्याचा), २ वाट्या गरम पाणी, १ टीस्पून मीठ, १ टेबलस्पून तूप

फोडणी

२-३ दालचिनी तुकडे, २-३ लवंगा, २-३ वेलच्या, २ तमालपत्र

कृती

* तांदूळ धुवून चाळणीत काढून निथळून घ्यावेत.

* पातेलीत तूप तापल्यावर फोडणीचे मसाले घालावेत व त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा.

* नंतर त्यावर तांदुळ घालुन गुलाबी रंगावर परतावे.

* त्यात गरम पाणी नारळाचा रस व मीठ घालून एकत्र करावे व पाणी आटल्यावर भात मंद गॅसवर वाफेवर शिजू द्यावा