राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील कोरोना स्थिती पाहता,राज्यातील राज्य मंडळाचे सर्व शाळेमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीकक्षाविणे पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.या मुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय म्हणाल्या शिक्षणमंत्री
एका व्हिडिओद्वारे त्यांनी शिक्षक,पालक,विद्यार्थी आणि सर्वांशी संवाद साधला.त्या म्हणाल्या, 'करोना स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे.शालेय शिक्षण विभागाने मधल्या काळात ऑनलाइन, ऑफलाइन,यूट्यूब,गुगल या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. पहिली ते चौथीच्या शाळा आपण संपूर्ण वर्षभर सुरु करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या,तर काही ठिकाणी नाही.जेथे शाळा सुरू झाल्या तेथेही अभ्यासक्रम पूर्ण करता आले नाही.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खरे पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन व्हायला हवे,मात्र यावर्षी ते होऊ शकलेले नाही.त्यामुळे या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी वर्गोन्नती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
Recent Comments
Kapil Rathod
Monday 05, 2021 - 10:31 amया वर्षीची स्थिति पाहून शिक्षण आनलाइन घ्यावा !
ReplyPayal Suresh ade
Tuesday 06, 2021 - 01:51 pmपुढील शिक्षण मध्ये प्रवेश देने
ReplySuresh ambaji jadhav
Monday 03, 2021 - 03:20 pmEducation fee purnpane band karave. Shikshan pan ekhada varsh thambavave.
ReplySuresh ambaji jadhav
Wednesday 05, 2021 - 07:35 pmVidyartyana shikshan milat nahi. Tar admission kele mhanje purn varshachi fee bharaychi ka? Hatavarch pot asalele palak kase fee bharnar ? Yach vichar sarkar v shikshan mantri kelet kay? Pot bharayache vande ani smartphon gheun Mobile company ana jagava. Kay vichar karatat bagha
ReplyLAKHAN MANIK RATHOD
Friday 25, 2021 - 01:03 pmजी विद्यार्थी feil त्यांचं काय होणार
Reply