हिमायतनगर प्रतीनिधी जयवंत पतंगे 24/07/21

हदगाव हिमायतनगर तालुक्यात दिनांक 21/07/2021 रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी बांधवाच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले , त्याची तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यासाठी आदेशित करण्यात यावे असे निवेदन मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड अशोकराव चव्हाण व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना आ. माधवराव पाटील जळगावकर यांनी निवेदन 23  जुलैला दिले असता त्यावर जिल्हाधिकारी नांदेड  तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. 

21 जुलैला अतिवृष्टी झाली असून सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस ,ज्वारी ,उडीद ,मूग ,हळद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांना त्वरित पंचनामे करून प्रस्ताव सादर करावेत असे आदेशीत केले आहे. 

नांदेड जिल्ह्यात हदगाव हिमायतनगर तालुक्यात 21 जुलै च्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले व त्यानंतर सततच्या पावसाने पिकात पाणी साचून पिके पिवळी पडली आहेत . या सर्व बाबी विचारात घेऊन पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना मदत करावी आ. माधवराव पाटील यांनी मुंबई येथे 23 जुलैला मंत्री महोदय यांची भेट घेऊन जिल्हाधिकार्‍यांना  पंचनामे करण्यात आदेशित करावे  लावल्याबद्दल ता. काँ. अध्यक्ष विकास पाटील देवसरकर, माजी जि. प. सदस्य सुभाष राठोड, जि. म. स. बँकेचे माजी संचालक गणेशराव शिंदे ,माजी संचालक रफिक शेठ , शिवाजीराव पाटील शिरपलीकर, माजी नगराध्यक्ष अखिल ,माजी जि. प. सदस्य समद खान पठाण, मार्केट कमिटीचे सभापती प्रकाश वानखेडे ,कैलास माने, संतोष अनगुलवार, संजय माने ,शिवाजी माने , सुभाष शिंदे, रामराव सूर्यवंशी, अब्दुल बाकी, संत्राम अलेवाड, बाबू जाधव आदीनी अभिनंदन केले.