विजय कदम उमरखेड,

          कृषी महाविद्यालय उमरखेड द्वारे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिराच ग्राम पळशी येथे दिनांक 20-26 डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित केलेले असून विशेष शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ग्राम पळशी ग्रामस्थांकरिता भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना आरोग्य तपासणी करिता येण्याचे आवाहन करत रक्तदान करण्याकरिता प्रेरित केले. पथनाट्याच्या माध्यमातून गावकऱ्यांना रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरामध्ये येण्याकरिता आमंत्रित केले. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वि.ना. कदम सर तसेच उद्घाटक  म्हणूनलाभले तर रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी  व्ही. बी. शिंदे यांनी त्याचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. माजी जिल्हा परिषद सदस्य  चितांगराव सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले उपस्थितांना युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास याबद्दल आपली भूमिका काय असायला पाहिजे काय असावि, युवकांची प्रमुख जबाबदारी, समाजाप्रती योग्य भावना याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस के चिंतेले सर हे होते या रक्तदान शिबिरामध्ये पुसद येथील  मल्टी स्पेशालिटी मेडिकेअर हॉस्पिटल येथील डॉक्टर्स व त्यांचा सहकारी स्टाफ आणि उमरखेड येथील डॉ. हुसेन व डॉ. खान आरोग्य तपासणी करिता उपस्थित होते. या शिबिरा मध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता आरोग्य तपासणी करण्यात आली व मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी सुद्धा या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला. सदर शिबिरा करिता महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने यांचे मार्गदर्शन मिळाले व महाविद्यालयातील कर्मचारी व  आदी सर्व पळशी गावातील लोकांनि व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.