विजय कदम उमरखेड,
.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला संलग्नित व शिवाजी शिक्षण संस्था, पुसद संचलित कृषी महाविद्यालय, उमरखेड यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना निवासी विशेष शिबिराचे आयोजन दिनांक 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर २०२२ दरम्यान ग्राम पळशी येथे करण्यात आले. आजादी का "अमृत महोत्सव" अंतर्गत "युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास" या विचार सूत्रानुसार ग्राम पळशी ता. उमरखेड. जि. यवतमाळ येथे नुकतेच उद्धघाटन झाले. उद्धघाटक म्हनून उमरखेड विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून पोफाळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर.के.हाके व एस.के.चिंतले प्राचार्य कृषि महाविद्यालय उमरखेड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.सर्वप्रथम उपस्थीत मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वच्छतेचे पुजारी राष्ट्रसंत गाडगे बाबा व हरित क्रांतीचे जनक कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच पुजन व दिप्रज्वलन करुण राष्ट्रिय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्धघाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना सामूहिक गीत गायन करून सुरुवात करण्यात आली. बंटी ढवस व कु. अस्मिता कांबळे या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागतगीत गावून स्वागत केले व त्या नंतर, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी व्ही.बी.शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरा दरम्यान नियोजित सामाजिक, सांस्कृतिक, कृषि महाविद्यालयातील विविध उपक्रमाची प्रदर्शनी, मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान, अंधश्रद्धा निर्मुलन, प्राथमिक ग्रामीण सर्वेक्षण तथा शेतकऱ्यांचा सामजिक आर्थिक स्तर, लंम्पि रोगा विषयावर कार्यशाळा माहिती संकलन व इतर कार्यक्रम संदर्भात प्रस्ताविक मांडले. आपल्या उद्घाटन भाषणामध्ये व्यंकट राठोड यांनी युवकांना मार्गदर्शन करत राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचे महत्त्व व राष्ट्रीय उभारणीमध्ये युवकांचे योगदान व सत्य परिस्थिती याबद्दल वास्तविक मांडले. आर.के.हाके (ठाणेदार) पोफळी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर याबद्दल आपले अनुभव व याची गरज या बाबत मार्गदर्शन केले. दिपक तेल यांनी युवकांनी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रनिष्ठा राष्ट्रप्रेम व समाजसेवा करूंन कृषीच्या विद्यार्थ्यानी शेतकरी बांधवाकरीता नावीन्यतम तंत्रज्ञान प्रचार व प्रसार करावा असे मार्गदर्शन केले. उपरोक्त उद्धघाटन समारंभास गावचे सरपंच शामराव घायडे तसेच मुख्याध्यापक विवेकानंद विद्यालय पळशी वाळके सर,धम्मपाल आडागळे सचिव, अशोकराव कदम उपसरपंच, पोलीस पाटील सदावर्ते ग्रामपंचायत पळशी, शेख चाँद शेख रहीम तंटामुक्ती अध्यक्षव समस्त ग्रामवासीयांची उपस्थिती लाभली. तसेच उपरोक्त शिक्षक तथा कर्मचारी वृंद कृषि महाविद्यालय उमरखेड यांची उपस्थिति व सहकार्य लाभले. सदरिल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी ढवस या विद्यार्थ्यांने केले तर आभार प्रदर्शन कु. सानिका शृंगारे यांनी केले. सदरील कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर चे ४० स्वयंसेवक. ग्रामवासी यांचे विशेष सहकार्य उपस्थिती लाभली
Post Comment