प्रतिनिधी, २१ जुलै २०२१:- कोरोनाच्या अभावी पर्यटन स्थळाठिकाणी जाण्यास बंदी घातली असली तरी काही लोक सरकारचे नियम पायदळी तुडवून सर्रास या ठिकाणी फिरताना दिसतात. उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जेवली हे गावात असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा येथे जाण्यासाठी आणि धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी विदर्भातून दुर वरून धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दिनांक 21 बुधवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास पावसाचा जोोर वाढल्यानं नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्यावरच ताटकळत थांबावं लागलं आहे.

सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यातुन पर्यटकांचा ओघ वाढला आहे, दुपारी सर्वदुर पावसाचा जोर वाढल्याने नदि नाले भरून वाहत आहेत, विदर्भ मराठवाड्यातुन आलेल्या पर्यटकांना परतीच्या प्रवासात पुलाची उंची कमी असल्याने, पर्यायी पुलामुळे दोन ते तीन तास पर्यटकांना ताटकळत रस्त्यावरच थांबावे लागल्याचे अनुभवास मिळाले आहे.

       या भागातील लोकप्रतिनिधींनी तात्काळ या ठिकाणी पर्यटकांच्या येण्या-जाण्याचा रस्त्यावरील पुलांची उंची वाढवुन पर्यटकांना जाण्या-येण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पर्यटक प्रवासी वर्गातुन होत आहे.

       यवतमाळ जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा या रस्त्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे, प्रथम दर्शनी पहावयास मिळाले आहे.