बुलढाण्यात मलकापूरवरून पिंपळगाव देवीकडे जाणाऱ्या रोडवर 'एसटी'चा बाहेर आलेला पत्रा घातक ठरला आहे. यामध्ये 45 वर्षीय शेतकऱ्यासह 22 वर्षीय तरुणाचा हात धडावेगळा झाला. तर अजून एक तरुण जखमी झाला आहे.

मलकापूरवरून पिंपळगाव देवीसाठी आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास एसटी निघाली होती. या बसचा चालकाच्या बाजूने पत्रा बाहेर निघालेला होता. त्यामुळे हा अपघात झाला.

असा झाला अपघात

आज सकाळी साधारणतः पाचच्या सुमारास मलकापूरहून पिंपळगाव देवीसाठी एक एसटी निघाली होती. नेमके त्यावेळेस परमेश्वर सुरळकर हे शेतात जायला निघाले होते, तर विकास पांडे हे धावण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी तिसरा व्यक्ती रोडच्या बाजूला शौचास बसला होता. यावेळी भरधाव आलेल्या बसचा पत्रा चालकाच्या बाजूने बाहेर निघाला होता. त्यामुळे दोघांना हात गमावावा लागला, तर एक जण जखमी झाला.