जळगाव जागृत महाराष्ट्र प्रतिनिधी विवेक सैंदाणे  
 जामनेर येथील उद्योगासाठी योजनेतून वीज डीपी मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रूपयांची मागणी नेरीतील सहाय्यक अभियंत्याने केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करण्याच्या तयारीत असतांना संशयिताला सुगावा लागल्याने पथकावर चारचाकी वाहन घालून पसार झाला. या घटनेमुळे जामनेर शहरात खळबळ उडाली आहे.
             सहाय्यक अभियंता शालीग्राम पाटील असे संशयित आरोपीचे नाव आहे. जामनेर तालुक्यातील एका तक्रारदाराने लघू उद्योगासाठी वीज डीपीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार १४ लाखांचे कोटोशन लागेल सांगितले. परंतू मी तुम्हाला मोफत वीज डीपी मिळवून देतो यासाठी ६ लाखा रूपये लागतील असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबाद पथक शालीग्राम पाटील याच्या मागावर होते.
            गुरूवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद लाचलुचपत विभागाने सापळा लावला. तक्रारदार हे सहा लाख रूपये घेवून सहाय्यक अभियंता शालीग्राम पाटील यांच्या घरी पोहचले. त्यावेळी संशयिताने कामानिमित्त बाहेर जात असल्याचा बनाव करून घराबाहेर असलेली गर्दी पाहून संशय आला. त्याने त्याची चारचाकी काढून निसटण्याचा प्रयत्न केला. लाचलुचपत विभागाचे पथक पकडण्याच्या प्रयत्नात असतांना त्याने थेट पथकाच्या अंगावर गाडी घातल्याचा प्रयत्न करत पसार झाला आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता शालीग्राम पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. संशयिताचा शोध घेणे सुरू आहे.