लातूर/प्रतिनिधी नागनाथ ससाणे
      औसा-लातूर रस्त्यावर ट्रकचा व दुचाकीचा औसा-लातूर मार्गावरील कारंजे खडी केंद्रासमोर भीषण अपघात झाला.यात पती-पत्नी ठार झाले असून १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता कि मृत महिलेचा पाय तुटून रोडच्या कडेला पडला होता.मृत पती-पत्नी हे कर्नाटकातील वांजरखेडा तांडा( ता.भालकी जी.बिदर )येथील रहिवासी असून मृत व्यक्तिचे नाव राजाभाऊ राठोड (वय ४९) पत्नी सखुबाई (वय ४५) व मुलगी स्वाती यांच्यासह दुचाकीवर  व मालवाहू  ट्रक औसा शहराच्या दिशेने जात होता . रस्त्याचे काम चालू असल्यामुळे रस्त्यावर माती साचलेली असून पावसामुळे हा रस्ता निरसरडा झाला आहे. त्यामूळे त्यांची दुचाकी ट्रकखाली गेली. यामध्ये सखुबाई ट्रकखाली गेल्या व त्यांच्या पाठोपाठ राजाभाऊहे सूध्दा ट्रकखाली सापडलेे त्यानंतर ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. सुमारे २० ते २५ फुटांपर्यंत ट्रक ने या दोघांना चिरडत नेलेे. या मध्ये सखुबाई यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर राजाभाऊ यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी स्वाती गंभीर जखमी झाली असून लातूर च्या शासकिय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.