राजेश किशन गायकवाड

किनवट  तालुक्यापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कमठाला शिवारातील विहिरीत दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी अस्वल पडले होते. सदर माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला कळविताच वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पाणी असलेल्या विहिरीतून अस्वलाला जिवंत बाहेर काढण्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. आणि सदर अस्वलाला जंगलामध्ये सोडून दिले. सदर कार्यवाही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अस्वलाला मात्र जीवदान मिळाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. किनवट परिसराततील जंगलात हिंस्र पशु आहेत. त्यात अस्वल, बिबटे, वाघ, कोल्हे असे इत्यादी वन्य पशु आढळतात. आणि जंगला शेजारी तलाव आहेत. पण पाण्याच्या शोधात भरकटले की गाव वस्ती, शेजारील शेतीकडे धाव घेत असतात, यामुळे तालुक्यात अनेक दुर्घटना ही घडल्या आहेत, परिणामी हल्ल्यात अनेक मानवांना जीवही गमवावा लागला आहे. त्यासाठी जंगलामध्ये जागोजागी पानवटे असणे अत्यंत गरजेचे असून जेणेकरून वन्य हीश्र पशूचे मानवी वस्तीकडे धाव घेण्याचे प्रकार थांबतील आणि भविष्यात पाळीव प्राणी आणि मनुष्यावरील हल्ले होणार नाहीत अशी मागणी वनप्रेमी करत आहेत. सदर यशस्वी कार्यवाही करण्यासाठी किनवट वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड, वनपाल मांजळकर, वनपाल कत्तुलवार,वनरक्षक रवी दांडेगावकर, भरणे, मुळे, जम्पलवाड इत्यादीनी परिश्रम घेतले.