एकीकडे कोरोनाच सावट आणि दुसरीकडे वाढती महागाईनी लोक त्रस्त आहेत त्यातच आता रुग्ण उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेल्यावर त्यांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत. गेली कित्येक दिवस हा प्रकार कविड रुग्णालयात चालू होता. त्यावर अनेकांना प्रश्न पडत असे की चोरी कोण करत आहे. या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी रुग्णालयातील सीसीटिव्ही फिटेज चेक करण्यात आले आणि शेवटी पडताळणी चोराचा शोध लागला. पुणे महानगरपालिकेनं बाणेर परिसरात उभारलेल्या कोविड रुग्णालयामध्ये हे सगळं घडलं. उपचार घेणार्‍या अनेक रुग्णांचे मागील काही दिवसात पैसे, मोबाईल आणि सोन्याची दागिने चोरी झाल्याच्या घटना घडल्या. रुग्णालयातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला असता साफसफाई करणारी एक महिला कर्मचारी चोरी करीत असल्याचे दिसून आले आहे. या कामात तिला एकजण साथ द्यायचा, त्यालाही अटक करण्यात आली आहे. कोविड रुग्णालयात या विषयावरून चर्चा सुरू झाली.

महिला आरोपी शारदा अनिल अंबिलढगे (वय ३६, रा. थेरगाव) आणि अनिल तुकाराम संगमे (वय ३५, रा. रहाटणी) असे दोन्ही आरोपींची नावं आहेत. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात पुणे महानगरपालिकेने कोविड रुग्णालय ऑक्टोबर २०२० मध्ये उभारल्यानंतर एका संस्थेला चालविण्यास दिले. त्या रूग्णालयात ३०० हून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. हे रुग्णालय कोविड रुग्णां करिता असल्याने रुग्णांशिवाय इतरांना आतमध्ये प्रवेश नाही.