अंतरवली, तालूका-भूम
जिल्हा- उस्मानाबाद 
    राज्य महामार्ग शिर्डी ते तुळजापूर हा नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. याच महामार्गावर उस्मानाबाद जिल्हा हद्दीत अंतरवली ते भूम रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे आजवर अनेक भीषण अपघात झाले आहेत.  स्थानीकांची व विविध पत्रकारांची मागणी असून देखील हे खड्डे बुजवले जात नाहीत, यामुळे नागरीक चिंतेत आहेत. या खड्यांवर संबंधीत शासकीय विभागाचे लक्ष वेधण्यासाठी व वाहनचालकांना खड्डे निदर्शनास आणुन देण्यासाठी अंतरवली गावातील स्थानिक तरूणांनी बुजगावण्याला साडी परिधान करुन या खड्ड्यात उभे केले आहे. यामुळे वाहनचालकांना खड्डे दिसून येतील व त्यामुळे अपघात होणार नाही असा त्यामागचा तरूणांचा उद्देश आहे. यामधे   अंतरवली मधील स्थानिक तरूण वैभव शिकेतोड, उमेश कोकाटे, संतोष दळवे, सुरज डोके, सुशांत जाधव, सुमीत पवार, ओंकार साबळे व बाबू दळवे सहभागी होते.