प्रतिनिधी, २७ जुलै २०२१ :- बांगला मुक्ती वाहिनीला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध ३ डिसेंबर, इ.स. १९७१ ला सुरु होऊन १६ डिसेंबर, इ.स. १९७१ ला संपले. 

    छत्रपती ग्रुप जवळगाव यांनी देखील पुढाकार घेऊन जवळगावमध्ये कारगिल विजय दिवसा साजरा केला. या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून देशाच्या रक्षणासाठी शहिद झालेल्या वीर जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील जेष्ठ सदस्य सदाशिवराव वर्हाडे, शिवाजीराव पवार, छत्रपती ग्रुप जवळगाव चे सदस्य सटवाजी पवार सर, पदमाकर नरवाडे, प्रधुम्न पवार,केदार पवार, गणेश सुर्यवंशी, सचिन नरवाडे, हनुमंत ढगे, दत्तराज पवार, अक्षय पवार, गणेश ढगे, आनंद नरवाडे, सचिन रावते, श्याम नरवाडे, गोविंद वडजे,आशितोष पवार, आदिनाथ पवार, आर्यन निर्मळे,साहिल पाचांळ,ओमकार माने,शुभम माने आदी ग्रामस्थ उपस्थित राहिले.