रविश कुमार यांनी NDTV च्या संपादक पदाचा राजीनामा दिल्यानंतर हा शेर बर्याच जणांना आठवला असेल। तुम्ही रविशकुमार यांचे विरोधक असाल किंवा समर्थक पण तुम्ही रविशकुमार यांना दुर्लक्षित करणारे नसणार हे निश्चित। रवि कुमार यांनी राजीनामा दिला ही अनपेक्षित किंवा आश्चर्यचकित करणारी गोष्ट नव्हती। राजकारणाबरोबरच अर्थकारणावर नजर ठेवणारांसाठी तर ही अजिबात आश्चर्याची गोष्ट नव्हती। गौतम अदाणी हे NDTV हे न्युज चॅनल विकत घेणार हे दोन तीन महिन्यापूर्वीच निश्चित झालते। तेव्हाच रविश कुमार जाणार हे 100% फिक्स झाले होते। खरतर रविश कुमार यांनी राजीनामा दिला नसता तर त्यात आश्चर्य वाटले असते। 

  मोदी समर्थकांना (खरतर त्यांच्या साठी मोदीभक्त हा शब्द योग्य राहील)  रविश कुमार हे त्यांना मोदी विरोधकच नाही तर मोदीद्वेषी वाटतात। काही काही मोदी समर्थकांना तर ते देशद्रोही पण वाटायचे हा भाग सध्या अलविदा। जेथे सर्व न्युज चॅनल मोदीजींच्या सकाळ संध्याकाळ आरत्या करायच्या तेथे हा रविश कुमार नावाचा पत्रकार सरकारला चुकीच्या निर्णयाबदल धारेवर धरत होता। जेथे इतर पत्रकार 2000 नोटात चिप असल्याचे जावई शोध लावत होते तेथे हाच माणुस सामान्य माणसाला कसा त्रास होत आहे हे सांगायचा। जेथे इतर टीव्ही न्युज चॅनल हिंदू - मुस्लिम करत कर्कश्य चर्चा करायचे तेथे हा एकटा पत्रकार शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, महागाई हे मुद्दे घेऊन जनतेला जागृत करायचा। 

       मोदी समर्थकांनी आणि स्वत: मोदीजींनी कितीही नाकारू  द्या पण मोदी सरकार हे भांडवलदारांच्या कृपेने सत्तेत आले आहे आणि टिकले पण आहे। संसदेत कितीही मोठे संख्याबळ असो मोदी सरकारचा पाया हा भांडवलदारांचा पैसा आहे। या भांडवलदारात अंबानी, अदानी हे मुख्य आहेत। त्यातही अदानी मोदीचे जरा खास आहेत।  भांडवली व्यवस्थेचे विरोधक, बरेचसे कम्युनिस्ट माईंड असलेले रवि कुमार यांचे NDTV चॅनल अदानीने विकत घेतल्यानंतर रविश कुमार जाणारच हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नव्हती। आणि ते गेले। 
आणखिन चार दिवसांनी रविश कुमार हे आपला 48 वा वाढदिवस साजरा करतील। त्यांनी जवळपास आपले अर्धे आयुष्य पत्रकारितेत घातले तेही NDTV या चॅनलवर घातले। उद्यापासून तुम्हाला NDTV चॅनलवर रविश कुमार दिसणार नाहीत। त्यांच्या चाहत्यांना त्यांचा वाढदिवस त्यांच्या YouTube channel वर साजरा करावा लागणार हे पचायला अवघड असले तरी हे सत्य आहे। 

    पत्रकारितेला स्वतः पत्रकारांनीच लोकशाहिचा चोथा स्तंभ म्हणून जाहीर केले आहे। पण आजकालची पत्रकारिता ही भांडवली पत्रकारिता आहे। सर्व न्युज चॅनल भांडवलदार चालवतात आणि हे भांडवलदार सरकार चालवतात। पत्रकार भांडवलदारांचे रखवालदार म्हणून काम करत आहेत। याला रविश कुमार हे अपवाद होते। पण या व्यवस्थेला रविश कुमार पचणारा ही नाही आणि रूचणारा  पण नाही। येथे पत्रकारितेच्या नावाखाली फक्त भाटगिरी करणारे भाट हवे आहेत। रवि कुमार जसे भाजपला नको तसेच ते काँग्रेसला नको। जसे ते उजव्यांना नको तसे ते डाव्यांना पण नको आहेत। काँग्रेसला पण त्यांनी धारेवर धरले होते हा इतिहास आहे। उगाच नाही त्यांना तीनवेळा रामनाथ गोयंका पुरस्कार मिळाला। आशियाचा प्रतिनोबेल रॅमेन मॅगसेस पुरस्कार मिळाला। 

   ज्या सामान्य जनतेचे प्रश्न रविश कुमार मांडत होते ती सामान्य जनता मात्र शांत आहे। हतबल आहे। तीला या सर्व घटनांशी काही देणेघेणे नाही। हे जग वाईट यासाठी नाही की या जगात वाईट लोक जास्त आहेत, तर हे जग वाईट यासाठी आहे की या जगात चांगले लोक चुप आहेत। ही सामान्य जनता जोपर्यंत चुप आहे तोपर्यंत ही व्यवस्था अशीच रविश कुमार गिळत राहणार। आणि सामान्य जनता रविश कुमार मेल्यानंतर पुतळा बांधणार हे मात्र खरे। 

  जागृत महाराष्ट्र न्यूज...