परभणी जिल्ह्यात रस्ता प्रश्न गंभीर विषय बनत चालला आहे, रस्त्यांना कोट्यवधी रुपयांची मंजुरी मिळून देखील हेवेदावे आणि टक्केवारीत रस्त्यांचा प्रश्न अडकुन पडून नागरिकांचे मरण होत आहे. 
जिंतूर ते परभणी रस्ता मंजूर होऊन चार वर्ष लोटली आहेत. प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन पण चार वर्ष झाले असून जिंतूर ते परभणी रस्ता हा विद्यार्थी व जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेले शासकीय निमशासकीय कर्मचारी
तसेच जिंतुर व तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्ण त्याच बरोबर विदर्भ - मराठवाडा यातील दळणवळणा साठी वापर होतो. परंतु मागच्या चार वर्षांपासून जिंतूर तालुक्यातील रुग्ण विशेष करून गर्भवती महिला या खराब व धोकादायक रस्त्यामुळे मध्यात बाळंत होत आहेत काही महिलांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. सदर रस्त्यावर मोठे पाईप ठेवलेले आहेत  आजवर त्याला अनेक दुचाकी स्वार धडकून गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. या ठिकाणी माहिती आणि दिशा दर्शक फलक सदर गुत्तेदारांकडून लावलेले नाहीत.या निष्काळजी पणामूळे दररोज अनेक अपघात होत आहेत.
त्याच प्रमाणे कामाचा दर्जा हा निकृष्ट असून सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे व कामाचा दर्जा चांगला करण्यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहेत. विशेष बाब ही की जिंतूर परभणी रस्त्या साठी जनआंदोलन समिती स्थापन करून एक लाख सह्यांचे निवेदन आयुक्त कार्यालयाला देऊनही त्यावर काहीच अंमलबजावणी झालेली नाही. प्रत्येक पावसाळ्यात खूप त्रास सहन करत व जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, या मुख्य प्रश्नावर जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी गोपाळ रोकडे यांनी केली आहे.