रत्नदीप शेजावळे
जिंतूर(१७/०७)

शहरातील बस स्थानकावर चालक व प्रवाशी मित्रांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी झाल्याची घटना 16 जुलै रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली असून हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोचलेल्या दोघांनी माघार घेत प्रकरण मिटवले मात्र या हाणामारीमुळे प्रवाशांना मात्र नाहक ताटकळत बसावे लागले होते.

शहरातील बसस्थानकावर मुक्ताई नगर येथील बस भुसावळ ते गंगाखेड गाडी क्रमांक एम एच 20 बी.एल.- 3373 बस दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आली यावेळी प्रवाशांनी गर्दी करत बस पूर्ण भरली असल्यामुळे बसस्थानकातील प्रवासी मिञ मोहन राठोड यांनी भुसावळ बसच्या चालक मुटकुळे यांना बस काढण्याबाबत सांगीतले मात्र चालकाने उद्धटपणे बोलून बस काढणार नसल्याचे सांगितल्यामुळे  दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली यावेळी दोघाणे उग्ररूप धारण करून एकमेकांना लाथा चापटाने व चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली यामुळे बसस्थानकात एकच गोंधळ उडाला असता बघ्यांची एकच गर्दी जमली होती भांडण मिटल्यावर नंतर भुसावळ येथील चालक-वाहक  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता त्यांच्या पाठीमागे वाहतूक नियंत्रक ढाकणे चिभडे हे देखील पोहोचले या ठिकाणी तडजोड झाल्याने शेवटी दोघांनी माघार घेत पोलीस स्थानकातून निघून गेले मात्र या प्रकरणामुळे भुसावळ ते मंठा जिंतूर पर्यंतच्या प्रवाशांना बस स्थानकावर तब्बल दोन तास नाहक ताटकळत बसावे लागले.