रत्नदीप शेजावळे
जिंतूर(१९/०६)

जिंतूर जालना महामार्गावरील पिंप्री (गीते) ते जिंतूर शहरापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च करून नवीन डांबरीकरनाचे काम करण्यात आले होते. मात्र रस्त्याच्या कामात मुरूमा ऐवजी चक्क काळ्या मातीचा भरणा केल्यामुळे पहिल्या पावसात जागोजागी रस्ता खचला असून खड्डे पडत आहेत. परिणामी वेळोवेळी राज्य महामार्ग विभाग जालना यांना माहिती देऊनही बोगस कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गुतेदारचे चांगभले झाले मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मागील एक वर्षपासून देवगाव फाटा ते जिंतूर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते राज्य मार्ग असल्यामुळे वाहनांची नेहमी वर्दळ असते रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे अपघात होणे नित्याचे झाले अशा वेळी अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला  तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर फुटणे आदी नित्याचेच झाले होते यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती तसेच रस्त्याचे काम लवकर करण्यासाठी तालुक्यातील सामाजिक संघटनांनी आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचे काम केले दरम्यान राज्य महामार्ग विभाग जालना कार्यालयाने रस्त्याचा कामासाठी तब्बल 16 कोटी रुपयांचा निधी डांबरीकरण रस्त्यासाठी मंजूर केला होता या कामाचे खासदार आमदारांचे हस्ते थाटात उदघाटन करण्यात आले परंतु काम सुरू करताच संबंधित कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू केले यात रस्त्याच्या साईड भरनात चांगल्या दर्जाचे मुरूम मेटल वापरणे गरजेचे होते मात्र राज्य महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कामावर अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने कंत्राटदाराने कामाचा सुमार दर्जा राखत चक्क काळ्या मातीचा भरणा करून अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम केले आहे यामुळे सध्या पहिल्याच पावसात रस्ता  जागोजागी खचला असून खड्डे पडत असल्यामुळे बोगस कामाचे पितळ उघडे पडले आहे परिणामी शासनाच्या कोट्यावधी रुपयांना अधिकारी,कर्मचारी व कंत्राटदाराने मिली भगत करून चुना लावला असल्याचे दिसून येत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांची चौकशी करून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारक करत आहेत.