रत्नदीप शेजावळे
जिंतूर (०९/०७)

लॉकडाऊन काळात ऑक्सिजनचे महत्व किती आहे याची प्रचीती सर्व जगाने अनुभवल्या नंतर आता अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यावर जोर धरू लागला आहे. जिंतूर तालुक्यातील ग्रीन आर्मी लिंबाळा येथे तरुण मित्रमंडळाच्या सहकार्यातून आज (दि-०९) रोजी सकाळच्या वेळी गावातील तरुण मित्रांनी मिळून मुख्य औंढा हायवे ते गावातील अडीच किमी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा शेतीच्या बांधावर  एकुण ३०० वृक्षांची लागवड केली आहे. यासाठी खास दिल्ली वरून सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या एका तरुण मित्राचा देखील समावेश होता. आज लिंबाळा गावातील तरुण वर्गाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला व प्रत्यक्ष पुर्ण देखील केला. झाडे लावा झाडे जगवा. या उपक्रमात,आकाश दराडे,रंगनाथ कंठाळे,संकेत दराडे,गोविंद दराडे,अनिल जवळे, प्रमोद गोरे,विशाल दराडे,तुषार दराडे,सुनिल दराडे,विठ्ठल दराडे,महादेव दराडे,विनोद पहारे,मोहन कंठाळे, त्रुक्षिकेश दराडे,गजानन दराडे,श्रेयस दराडे,सचिन दराडे,अमोल सानप, प्रमोद वाकळे आदींनी परिश्रम घेतले आहेत. तरुण मित्रांनी मिळून राबविलेल्या या उपक्रमाचे गावकऱ्यांसह तालुक्यातील पर्यावरण प्रेमींकडून स्वागत होत आहे.