रत्नदीप शेजावळे
जिंतूर(१९/०७)

तालुक्यातील सोनापूर येथील एका शेतकर्‍याने कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार (दि १९) रोजी घडली आहे.Farmer Suicide News  Jintur Parbhani News सोनापूर येथील शेतकरी संजय धर्मा चव्हाण वय (३५ वर्ष) यांनी कर्ज बाजारीपणामुळे शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक  पोलीस निरीक्षक बळवंत जमादार ,पो.हे.काॅ. इरफान इनामदार,गाढवे यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला मयत शेतकर्‍यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे कर्ज असल्याचे समजते दरम्यान नारायण जेमा चव्हाण यांच्या खबरेवरून चारठणा पोलीस ठाण्यात आकस्मीत मुत्युची नोंद करण्यात आली आहे.