जिंतूर
दि-१९/०८

मराठवाड्यात झालेल्या संततधार पावसाने अनेक शेतीपिकांचे मोठ नुकसान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील आडगाव आणि दुधगाव मंडळात अतिवृष्टी आणि ढगफूटीसदृश पावसाने अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले होते, त्यामुळे शेतीपीक वाहून तर काही ठिकाणी सडून गेली आहेत. या सर्व परिस्थितिचा विचार करता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस राजेश घुगे रेपेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गत 10 ते 15 दिवसात आडगाव दूधगाव मंडळासह संपूर्ण जिंतूर तालुक्यात अति मुसळधार पावसाने शेतकऱ्यांवर आस्मानी संकट असून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी आहे.