शिरूर ताजबंद दिलीप मोरे :- शुक्रवार दिनांक २४ मार्च रोजी रात्री ८:०० वाजता अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील भीम नगर येथे जयंती उत्सव कमिटीचे मार्गदर्शक माधव सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्सवासाठी समिती गठित करण्यात आली त्यात अध्यक्षपदी बळीराम गोपाळराव मोरे,उपाध्यक्षपदी माधव सरवदे तर सचिव पदी धर्मपाल सरवदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारणी सहसचिव मारोती सरवदे कोषाध्यक्ष शिवाजी सरवदे, बालाजी कांबळे, स्वागत अध्यक्ष भगवानदादा कांबळे, प्रकाश सरवदे, संघटक शिवाजी बनसोडे,राजेश सरवदे,नितिन कांबळे,अशोक वाघमारे,ऋषिकेश सरवदे, प्रसिद्धीप्रमुख बाबुराव श्रीमंगले,राजकुमार सोमवंशी, मलिकार्जुन स्वामी,बालाजी पडोळे,दिलीप मोरे, चंद्रशेखर तोगरे, तर सदस्य मदन भालेराव, प्रशांत कांबळे, दिलीप कांबळे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षांची निवड होताच छत्रपती शाहू महाराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला.
विशरत्न परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने १४ एप्रिल रोजी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व व्याख्यान तर २६ एप्रिल रोजी शहरातून डीजे व ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक तर २७ एप्रिल रोजी भीम गीतांचा कार्यक्रम यांच्यासह विविध सामाजिक,सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून भीम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष बळीराम मोरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ह्यावेळी सदाशिव भिकाजी सरवदे, नागनाथ बनसोडे, सत्यवान सरवदे, विशाल सरवदे, अंशुल सरवदे,नागेश सरवदे, योगेश बनसोडे, शिवाजी कांबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बळीराम मोरे तर सचिव पदी धर्मपाल सरवदे.

Source:
इतर फोटो

Source:

Source:
Post Comment