मुंबई, मनोरी गावात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी अचानक मध्यरात्री कोळी बांधव ज्या शेड मध्ये मच्छिचे जाळ्या ('डोल) ठेवतात त्या ठिकाणी भयंकार आग लागली होती याची माहिती तात्काळ जागृत महाराष्ट्र न्यूजला भेटली असता जागृतने या बातमीचा आढावा ही घेतला होता.तात्काळ आमदार सुनील राणे,माजी मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख,यांनी भेट घेत आर्थिक सहाय्य ही केले होते.या वेळी मत्स्य व्यवसाय, तहसीलदार, संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामेही केले होते.या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० नुकसानग्रस्तांना रु.५४,००,०००/- (रु. चौपन्न लक्ष ची घोषणा केली होती. त्या संदर्भात 16 मे 2023 रोजी नुकसानग्रस्तांना ती निधी देण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट असते. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.“मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा फायदा तात्काळ पीडितांना झाला पाहिजे या साठी या निधीची तरतूद केली जाते.ही निधी आज चार महिन्यानंतर दिले जाते यावरून सरकारी काम चार दिवस थांब असे स्पष्ट होत असल्याचे दिसून येते...
तातडीने दिली जाणारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी अखेर चार महिन्यानंतर मनोरीतील त्या दहा मच्छिमार बांधवांच्या हाती....

Source:
इतर फोटो

Source:

Source:
Post Comment