प्रतिनिधी, २६ जुलै २०२१ :- दिल्ली स्थित महाराष्ट्र सदनात सकाळी आग लागली आहे. राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.आगीची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

    आज सकाळी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांच्या मदतीने ही आग आता आटोक्यात आणण्यात यश आलं आहे.