जिल्हा प्रतिनिधी-नागनाथ ससाणे

सध्याची बाल पिढी मोबाईल वरच्या अनेक चित्र विचित्र पबजी सारख्या गेम मध्ये अक्षरशः वेडी झालेली असताना शिरोळ या ठिकाणी अध्यात्माचा वारसा जपत आताच्या आणि येणाऱ्या पिढीला विज्ञान आणि अध्यात्म यांचे संस्कार मिळाले पाहिजेत या साठी शिरोळ येथील ह भ प श्री संग्राम देव महाराज यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी100 पेक्षा जास्त अनाथ आणि अध्यात्माची गोडी असलेल्या मुलांना त्यांच्या आई वडिलांनी शिरोळ येथील बाल आध्यत्मिक संस्कार केंद्रात ठेवले आहेत.
 या उपक्रमाचे आपण कौतुक केले पाहिजे. असे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आपले मत व्यक्त केले.    
 शिरोळ जानापुर येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त उपस्थित राहून पंचक्रोशीतील भाविक भक्तांना  राहुल भैया केंद्रे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी हरिभक्त परायण संग्राम देव महाराज, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, प्रा. पंडितराव सूर्यवंशी, सरपंच शिवाजीराव काळगापूरे, उपसरपंच सुनील जाधव, वैजनाथराव गिरी महाराज, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव एडवोकेट सागर बिरादार,किशोर पाटील, मदन पाटील, केशव सगर, मंडे मामा, संदीप महाराज आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते