नांदेड:सतिश वाघमारे

दलित समाजातील लोक मराठ्यांच्या घरी वसुली साठी येतात काय असे म्हणून, एका ऑटो फायनान्सच्या कंपनी मध्ये काम करणाऱ्या कमिशन एजेंटला मारहाण करून डांबून ठेवल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाल्याने 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
  योगीराज नारायण कावळे हे
एका ऑटो कंपनी मध्ये कमिशन एजेंट म्हणून काम करित होते.तसेच योगीराज कावळे यांनी फायनन्सची थकीत रक्कम वसुली करण्याकरिता मारोती अंकुशकर रा. घोटी. ता. किनवट जिल्हा नांदेड यांच्याकडे ते दि.17 जून 2017 रोजी गेले.
 त्यावेळी त्या गावातील बालाजी प्रल्हाद पावडे वय 34, कैलास देवराव पावडे, राजेंद्र देवराव पावडे वय 26 गजानन दत्ता
 बोणंढारकर, वय 30 वर्ष, या चौघानी मिळून,मराठ्यांच्या घरी दलित व्यक्ती वसुलीसाठी कसा काय येतो....?
असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करित अश्लील,अपशब्दांचा वापर करित फायनन्स कमिशन एजेंट नारायण कावळे यांना मारहाण करित घोटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात  नेले.व त्यास ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले. 
.तेव्हा फायनन्स एजेंट नारायण कावळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून कशी बशी, जीव मुठीत धरून सुटका करून घेतली. व 18 जून 2017 रोजी किनवट पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकारचे कथन केले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक 157/2017 भारतीय दंड संहिता कलम - 323, 506, 342 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे 3 (1) (10) (आर) प्रमाणे गुन्हा नोंदविला. तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय वाळके यांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास करताना आरोपी बालाजी पावडे, कैलास पावडे, राजेंद्र पावडे वर गजानन बोनढारकर यांना अटक करून त्यांचा विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.
या प्रकरणा संदर्भात न्यायलयात एकूण 9 साक्षीदाराचे   जवाब तपासण्यात आले.
उपलब्ध झालेल्या पुरावा व साक्षीदाराने दिलेल्या जवाबवरून अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश- एस. इ. बांगर यांनी आरोपीला दोषी ठरवत भारतीय दंड संहिता कलम 323,506,342,342, या कलमा अंतर्गत 1 वर्ष सक्त मजुरी व प्रत्येक कलमासाठी प्रत्येक आरोपीस एक एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. व त्याच बरोबर ऑट्रॉसिटी कायद्या अंतर्गत 3 वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येक दोषी आरोपीस 20 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्या मध्ये सरकारी पक्षाची बाजू ऍडव्होकेट बी. एम. हाक्के तर आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट- प्रवीण आयचीत यांनी मांडली. तर या खटल्यामध्ये किनवट तालुक्याचे पोलीस निरीक्षक - अभिमन्यू साळुंके, यांच्या मार्गदर्शना खाली त्यांचे सहकारी भगवान महाजन, एस. एस.ढेंबरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.