नांदेड:सतिश वाघमारे
शुभांगी वाघमारे व गायत्री पाटील 10 वी बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम.महाराष्ट्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या 10 वी बोर्डाच्या परीक्षेत कु. गायत्री सुभाष पाटील व शुभांगी सुरेश वाघमारे या विध्यार्थीनींनी शाळेतून प्रथम क्रमांक मिळवीत घवघवीत यश संपादन केले.बाराहाळी येथील
विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून, एस. एस. सी. बोर्ड (दहावी ) या परीक्षेकरिता एकूण 210 विध्यार्थी बसले व त्यापैकी 205 विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. .यापैकी 75% पेक्षा जास्त गुण घेवुन विशेष प्रविण्यासह 158 विध्यार्थी उत्तीर्ण झाले. तर प्रथम श्रेणीत 42 तर द्वितीय श्रेणीत 04, विध्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 01 विद्यार्थी पास झाला असून विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बाराहाळी या शाळेचा
एस. एस. सी. बोर्डचा 98% निकाल लागला आहे. विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, या केंद्रातून सेमी माध्यमातून कु.गायत्री सुभाष पाटील व कु. शुभांगी सुरेश वाघमारे या विद्यार्थिनींनी 94.40 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे या निकाला वरून एकंदरीतच मुलीनीच बाजी मारली आहे. असे निष्पन्न होत आहे.
यामुळे विद्या विकास विद्यालय, या संस्थेचे अध्यक्ष - श्रीमती विजयाताई भाऊसाहेब देशपांडे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
नांदेड शुभांगी वाघमारे व गायत्री पाटील 10 वी बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम

Source:
इतर फोटो

Source:

Source:

Source:
Post Comment