प्रतिनिधी, २८ जानेवारी २०२२ :- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात दररोज चार हजारावंर कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

     गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाची चिंताजनक स्थिती असल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना मृत्यूंमुळे प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. याशिवाय लसीकरणावरही भर दिला जातो आहे.