नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ. जामिनासाठी अर्ज करणार आहे, अशी माहिती या निकालानंतर आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतले होते. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.
Post Comment