प्रतिनिधी, १४ जुलै २०२१ :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले असून ही बैठक अनेक प्रकारे विशेष ठरली आहे. कॅबिनेटच्या विस्तारानंतर मंत्रिमंडळातील हे दुसरे मंत्रिमंडळ आणि मंत्री परिषदेची बैठक आहे. 

    या बैठकीत वस्त्रोद्योग क्षेत्रात आरओआयसीटीएल योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे निर्यातीला चालना मिळणार आहे. तसेच रोजगार निर्माण होण्यासही मदत होणार आहे. देशातील कंपन्या जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील. 31 मार्च 2024 पर्यंत कर सवलत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 1 जानेवारी 2021 पासून अंमलात येणार आहे.

     जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) तीन टक्क्यांनी वाढ झाली. जानेवारी 2021 मध्ये यात चार टक्क्यांनी वाढ झाली होती. अशा प्रकारे कर्मचार्‍यांना डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवून फायदा होणार आहे. मात्र, सरकारने गेल्या वर्षी जानेवारीपासून त्यावर बंदी घातली होती. आता दीड वर्षानंतर तिन्ही हप्त्यांवरील स्थगिती काढून टाकण्यात आली.

     कोरोना महामारीमुळे सरकारने डीए गोठविला होता. यासह माजी कर्मचार्‍यांच्या डीआरचे हप्तेही दिले गेले नाहीत. अर्थ मंत्रालयाने जून 2021 पर्यंत 50 लाखांहून अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता (DA) वाढवून देण्याचे मान्य केले होते.