नांदेड, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने 54 वर्षे, तर भाजपने 16 वर्षे सत्ता भोगली. देशातील बजबजपुरीला काँग्रेस भाजप जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मेक इन इंडिया' बनवणार होते पण 'जोक इन इंडिया' झाला. कुठे गेला 'मेक इन इंडिया' देशातील प्रत्येक शहरात चायना बाजार भरला. दीपावलीचे दिवे, गणेशमूर्ती, राष्ट्रीय ध्वज फटाके, होळीचे रंगही चीनमधून येतात असे टीकास्त्र सोडत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अबकी बार किसान सरकार असा नारा दिला.

बीआरएस पक्षाची सभा आज नांदेडमध्ये झाली. या सभेला संबोधित करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सीआर बोलत होते. माझे भाषण गावागावांत पोहचवा

के. चंद्रशेखर राव म्हणाले, देशाच्या विचारधारेला बदलण्याचे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा आम्ही निश्चय केला. त्यामुळे आम्ही बीआरएसचे उद्घाटन केले. देशात समर्थन मिळत आहे. मी विनम्रतेने पार्थना करतो की, माझे भाषण येथेच विसरू नका. गाव, शहरात गेल्यानंतर या माझ्या भाषणावर चर्चा करा. देशाला चालवण्यासाठी मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. अनेक नेते स्वातंत्र्यानंतर देशाने पाहीले. अनेक मुख्यमंत्री, पंतप्रधान बनले. परंतु भाषण मोठे मोठे येते.