प्रतिनिधी, १७ जुलै २०२१ :- दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर पाहून सामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोलचे नवीन दर जारी केले आहेत. गुरुवारी इंधनाचे दर वाढवल्यानंतर शुक्रवारी दरवाढ झाली नाही. मात्र आज पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढले आहेत.  मुंबईमधील पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी वाढ झाली आहे तर राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ३० पैसे प्रतिलिटरने महागले दिल्लीमध्ये आजपासून पेट्रोल १०१.८४ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. डिझेलच्या दरामध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाही. डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहे. मुंबईमध्ये एका लिटर पेट्रोल आता १०७.८३ रुपये इतकं वाढलं आहेत.

     दिल्लीत मे महिन्यापासून आतापर्यंत ४१ वेळा इंधनदरवाढ करण्यात आली आहे. या ४१ दिवसांमध्ये पेट्रोल १०.७९ रुपयांनी तर डिझेल ८.९९ रुपयांनी महागले आहे. जुलै महिन्यामध्येच नऊ वेळा इंधनरदवाढ झाली आहे. मे महिन्यात १६ वेळा पेट्रोलचे दर वाढलेत. गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १५ पैशांनी वाढ करण्यात आली होती. गेल्या ४ मेपासून पेट्रोलच्या दरात ४१ वेळा तर डिझेलच्या दरात ३७ वेळा वाढ करण्यात आली. देशामध्ये गुरुवारच्या आधी तीन दिवस इंधनाचे दर स्थिर होते. मात्र गुरुवारी त्यात वाढ करण्यात आली. शुक्रवारी दरवाढ झाली नाही. मात्र आज पुन्हा दरवाढ करण्यात आलीय. मागील दोन महिन्यांमध्ये देशातील इंधनाचे दर प्रती लीटरमागे दहा रुपयांनी वाढले आहेत.