रामदास चव्हाण महाड रायगड
बुधवार दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी महाड तालुक्यातील वहूर येथील फजंदार इंग्लिश स्कूलमध्ये सायन्स एक्जीबिशनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक प्रकल्प देखावा बनवून या स्पर्धेमध्ये सादर केले होते. या एक्जीबिशन दरम्यान फजंदार इंग्रजी माध्यम शाळेतील इयत्ता 8 वी मध्ये शिकणारी मरीयम मुदससिर पटेल या विद्यार्थिनीने केलेला एका घरा मध्ये वीज निर्मिती प्रकल्प देखावा कसा करता येईल यावर देखाव्याचे प्रात्यक्षिक दाखविले.तसेच परिसरातील आकर्षक सौंदर्य देखावा बनविला होता. मरियम मुदशीर पटेल या विद्यार्थिनीने बनवलेला हा देखावा सर्वांना आकर्षित करणारा होता, मरीयम ने केलेला प्रकल्प देखावा विषयी सविस्तर माहिती या विद्यार्थिनीने प्रमुख मान्यवरांना दिली, इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या मरियमचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरी मधील अहमद फैसल झटाम व शगफ शाकिब नाईक या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकर्षक देखाव्यावर पंचांनी त्यांना योग्य मार्क दिले आहेत.
Post Comment