चिरंजीवी संघटनेचे राष्ट्रीय संघटक चेतन कांबळे ह्यांनी आज ८९ वे उपोषण कल्याण मधील नवनित मैत्रकूल येथे पार पडले.
     चिरंजीवी संघटना ही बालमजुरी, बालविवाह, बालभीकारी आणि बालकांच्या शैक्षणिक भविष्यासाठी गेली ८  वर्ष कार्य करीत आहे. #बचपनबचाओमानवता_बचाओ ह्या मोहिमेची सुरुवात संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी तोडकरी ताईंनी ३ दिवसाच्या उपोषणापासून केली.ह्यानंतर प्रत्येक सोमवारी एक दिवसाचे उपोषण करून लोकांमध्ये जनजागृती करत आहेत.ह्या मोहिमेला बघता-बघता २ वर्ष पूर्ण झाला आहे.ह्या मोहिमेची सुरुवात २४,२५,२६ डिसेंबर पासून झाली..
     संघटनेचे राष्ट्रीय संघटक चेतन कांबळे ह्यांनी आज ह्यांनी १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.बालकांच्या हकांसाठी आम्ही सर्व आपली जबाबदारी समजून लहान वयात काम करत आहोत.असे संघटनेच्या राष्ट्रीय सचिव श्वेता पाटील यांनी सांगितले.
     उपोषणाची सुरुवात विद्यार्थी भारती संघटनेचे राज्य कार्यवाह आरती गुप्ता ह्याच्या हस्ते झाली असून बालकांविषयीच्या समस्या त्याचबरोबर कोरोनाचा काळ भयंकर असताना देखील उपोषण थांबले नाही असे त्यांनी चिरंजीवी चे कौतुक करत  त्याचे मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर उपोषणाचा समारोप भिवंडी तालुका अध्यक्ष परेश चौधरी ह्यांच्या हस्ते झाल्याची माहिती राष्ट्रीय प्रचार प्रसार प्रमुख गिरीश शुक्ला यांनी दिली.