केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड (सीबीएसी) आणि आयसीएससी बोर्डाच्या 12 वी च्या परीक्षा रद्द कराव्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. देशातील हजारों विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेल्या या याचिकेवर सोमवारी देखील कोणताही ठोस निर्णय झाला नाही. आता या प्रकरणातील सुनावणी 3 जून रोजी होणार आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

ममता शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकारच्या वतीने अ‌ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी युक्ती वाद केला. या प्रकरणात केंद्र सरकार दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेईल, त्यासाठी सर्वोच्च न्यायलयाने आम्हाला गुरुवार पर्यंत वेळ द्यावा अशी विनंती वेणुगोपाल यांनी केली. न्यायलयाने ही विनंती मान्य करत सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली आहे.