जागृत महाराष्ट्र आम्रपाल वाघमारे

चिखली :-- तालुक्यातील अमडापूर येथील वार्ड नंबर चार मधील  रहिवासी असलेल्या एका 23 वर्षीय युवकाने  स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  दि. ७ आॅगस्ट  रोजी उघडकीस आली आहे.
 याबाबत अमडापूर पोलीस स्टेशनला मुरलीधर दामोदर तोरमल रा. टाकरखेड   यांनी माहिती दिली की,  दि. ७ आॅ.रोजी दुपारी याचा मेहवना  सागर भगवान डुकरे वय २३ वर्ष रा. अमडापूर याने  मेंडसिगा रोडला लागून असलेल्या स्वतःच्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या  माहितीवरून  स्थानिक अमडापूर पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  सदर आत्महत्या ही कशामुळे झाली हे कारण अजुन अस्पष्ट आहे . पुढील तपास अमडापूर  ठाणेदार नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काॅ. सुमेरसिंग ठाकुर ,दिपक मगर , दिपक भुतेकर हे करीत आहेत.