प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहताना अनुपम खेर यांनी लिहिले की, सतीश तुझ्याशिवाय आयुष्य सारखे राहणार नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सतीश कौशिक हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता, विनोदी कलाकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते.

त्यांचा जन्म 13 एप्रिल 1965 रोजी हरियाणामध्ये झाला. बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी त्यांनी थिएटरमध्ये काम केले. सतीश कौशिक यांची ओळख 1987 मध्ये आलेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटातून झाली. त्यानंतर 1997 मध्ये आलेल्या दिवाना मस्तानामध्ये पप्पू पेजरची भूमिका केली. सतीश कौशिक यांना 1990 मध्ये राम लखन आणि 1997 मध्ये साजन चले ससुरालसाठी सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.अनुपम खेर सह 7 मार्च ला खेळली अखेरची  रंगांची होळी. रात्री प्रकृती बिघडली, रुग्णालयात मध्यरात्री 1.30 वा. मृत्यू