रामदास चव्हाण-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2022 चा जमाखर्चा अहवाल सहविचार सभा अध्यक्ष अनंत तांबे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2023  नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष म्हणून योगेश कासारे, उपाध्यक्ष  सुमित मोरे, सरचिटणीस  सखाराम जाधव, सहसचिव प्रफुल्ल पवार, खजिनदार  वैभव कांबळे, सहखजिनदार  गंगाराम भोसले इत्यादींची निवड करण्यात आली. येणाऱ्या 14 एप्रिल 2023 ची 132 वी जयंती सर्वांनी एकत्र येऊन साजरी करण्याचे एकमताने ठराव केला आहे. यावेळी सर्व बौद्ध समाजाच्या विभागातील कार्यकारणी उपस्थित होते. यापुढे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश कासारे यांनी बोलताना सांगितले की आम्हा नव तरुणांना अध्यक्ष होण्याची जी संधी दिली आहे त्याचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि जोमाने कामाला सुरुवात करू असे बोलत सर्व समाजाचे आभार मानले.