प्रतिनिधी, १४ जानेवारी २०२२ :- पी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष तसेच नगरसेविका संगीता संजय सुतार यांनी मार्वे टी जंक्शन ते मढ जेट्टी दरम्यान ९०० इंचाची जलवाहिनी टाकण्याबाबतची मागणी पी उत्तर सहाय्यक अभियंता जलकामे विभाग यांच्याकडे लावून धरली होती. संगीता सुतार यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आलेलं आहे. संगीता सुतार यांनी २९ मे २०१९ पासून जलवाहिनीची मागणी करणार पहिलं लेखी पत्र लिहिलं होतं.

      मढ परिसरातील पाणी पुरवठा सुधारण्याकरिता जल अभियंता विभागाद्वारे टी जंक्शन ते मढ जेट्टी येथे नवीन ९०० मिमी, ७५० मिमी, ६०० मिमी,४५० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याची मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीकडे आहे. टी जंक्शन ते मढ जेट्टी या दरम्यान जलवाहिनी टाकण्याची मंजुरी मिळाली असून या कामासाठी किती महिने लागतील हे सांगता येत नाही मात्र आता मढ येथील स्थानिक नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.