मालाड,मुंबई
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 46 चा श्री गणेश वंदना-आरती संग्रह प्रकाशन सोहळा, स्वराज फाऊंडेशन चे संस्थापक, अध्यक्ष आकाश पाटील यांच्या हस्ते पार पडला. सदर श्री गणेश वंदना-आरती संग्रह, मनसे प्रभाग क्रमांक 46 चे शाखा अध्यक्ष राजेंद्र नंदनवार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला आहे. या संग्रहाच्या प्रती प्रभागातील सर्व प्रमुख गणेश मंडळे व घरगुती गणपतींना वितरीत करण्यात येणार असल्याचे शाखा अध्यक्ष राजेंद्र नंदनवार यांनी यावेळी सांगितले. 
    या प्रकाशन सोहळ्यास शाखा अध्यक्ष प्रदीप नानरकर, महिला शाखा संघटक सारीका  केळंबेकर, उपशाखा अध्यक्ष सर्वश्री बाळासाहेब पाडेकर, अनिल पवार, कार्यालयप्रमुख संजय बने व इतर मनसेचे कार्यकर्ते उपस्थीत होते.