जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड

सविस्तर माहिती अशी की जगन् राम पहांन वय 43 मुळगाव :: मुलवाडी , पश्चिम बंगाल, सध्या राहणार कुंभारवाडा (बौद्धवाडी) बिरवाडी, या इसमाची तब्येत बरी नसल्यामुळे तो  शेतातील मार्गाने पायवाट करीत जात असताना बांधावर ६:३० वाजता त्याचा मृत्यू देह आढळला. त्याचा भाऊ संदीप राम पहाण हा आपला भाऊ अजून घरी का आला नाही म्हणून शोधण्यासाठी गेला असता त्याला आपल्या भावाचा मृत्यू देह शेतातील बांधावर दिसला. सदर घटनेची माहिती महाड एमआयडीसी पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व सदरचा मृत्यू देह शवविच्छेदनात करिता बिरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. एकाच आठवड्यामध्ये दोन मृत्यू देह तेदेखील एक मृत्यू देह सरकारी ग्रामीण रुग्णालय या शेजारी तर दुसरा मृत्यू देह बिरवाडी येथील नामांकित हॉस्पिटल च्या मागे सापडला. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सदर घटनेची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असून या संबंधित घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस प्रभारी अधिकारी युवराज खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.