मुंबई प्रतिनिधी, २१ जून २०२१ :- मालाडमधील मालवणी परिसरात रविवारी (ता. २० जून २०२१) रोजी रात्रीच्या सुमारास  मास्टरजी कंपाऊंडला भीषण आग लागली आहे. मास्टरजी कंपाऊंड हे प्रसिद्ध असल्याने यात चित्रपटासाठी आवश्यक असलेले साहित्य होते परंतु या आगीत साहित्य जाळून खाक झालं आहे. सुमारे रात्री साडे नऊ ते साडे दहाच्या सुमारास ही आग लागली असून धुराचे लोट दूरदूरवर पसरले आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

   या परिसरामध्ये अनेक रहिवासी बंगले आहेत. त्याचबरोबर काही कार्यालये आणि दुकानंही आहेत. या आगीत जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करत आहेत.