मुंबई प्रतिनिधी, १० जून २०२१ :- मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाड पश्चिमेला असलेल्या न्यू कलेक्टर कंपाउंड परिसरात एक रहिवासी इमारत कोसळली. रात्री ११.१५ च्या सुमारास इमारत कोसळली. या इमारतीच्या दुर्घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १७ जण जखमी अवस्थेत आहेत. जी इमारत कोसळली त्याच्या आसपासच्या तीन इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत.

       आतापर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिला आणि लहान मुलांसह पंधरा जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवासी अडकले असण्याची शक्यता यावेळी मुंबई ११ झोनचे विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

        मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनीही दुर्घटनेची पाहणी केली असून पावसामुळे इमारत कोसळली. बचावकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती मंत्री अस्लम शेख यांनी दिली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.Mumbai Malad west residential building collapses Live Update)