मुंबई प्रतिनिधी, ९ जून २०२१ :- महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने देताच मुंबई आणि उपनगरात पावसाने खरोखरच हजेरी लावली आहे. मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या विभागांमध्ये पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे.

       ढगाळ वातावरण व थंडगार वाऱ्यासह पावसाने आज हजेरी लावली आहे. मुसळधार पाऊस आणि लोकल सेवा सामान्यांसाठी बंद असल्याने सर्वसामान्यांचे चांगलेच हाल झाल्याचं चित्र दिसलं. मुंबईत पाऊस पडला की सखल भागात पाणी साठ्याची भीती कायम असते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारे पाणी साठलं तर बस सेवांवर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता असते.

     हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सतर्क व सज्ज राहायला सांगितलं. ११ जून आणि १२ जूनला कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ९ जून ते १२ जूनपर्यंत महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलं आहे.