नागनाथ ससाणे,

मुंबई --
अखिल भारतीय वंजारी युवा संघटना व वंजारी समाज मुंबई यांच्या तर्फे राहुल केंद्रे यांना वंजारी समाज भूषण पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण सेंटर,नरिमन पॉईंट मुंबई येथे करण्यात आले.वंजारी समाज, काल आज आणि उद्या......या वंजारी समाजाच्या पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

 राजकीय क्षेत्रामध्ये अल्पावधीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊन लोकनेते मा.गोपीनाथ राव मुंडे साहेब यांचा पुतळा  लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात बसवण्याचा ठराव घेतला व आता काम पूर्णत्वास जात आहे.कोरोना काळात जिल्हा वासियांची केलेली सेवा, दिव्यांग बांधवाना आठ कोटी चे साहित्य वाटप महाराष्ट्रातील पहिली व देशातील दुसरी जिल्हा परिषद, राज्यभरात नावाजलेला दिव्यांगासाठी otizam center हा प्रकल्प,DCPS बांधवांचा पूर्ण पंधरा वर्षापासूनचा पेंडिंग असलेला दिलेला हिशोब व जमा केलेली शासकीय रक्कम,शाळेसाठी राबविलेला बाला उपक्रम, हैप्पी होम अंगणवाडी, गरोदर मातांना बेबी केयर किट वाटप, आदींसह लोकोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल व 
समाजाचे नाव उंचावल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल भकेंद्रे यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
.

 या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव मा. श्री प्रवीणजी दराडे,कार्यक्रमाचे अध्यक्ष मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीपजी ढोले, उपायुक्त गुट्टे, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाताताई ढोले, राज्याच्या आयकर आयुक्त पल्लवीताई दराडे, शिक्षण विभागाचे सह आयुक्त शेषरावजी बडे, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. अमोलजी गीते, उद्योगपती बबनजी सांगळे, गुजरातचे उद्योजक माधवजी केंद्रे, एम एस ई बी चे डी. एफ.विजयानंदजी काळे, शांतीवन प्रकल्प बीडचे दीपकजी नागरगोजे, मंत्रालयातील स्वीय सहाय्यक मारुती फड, कार्यक्रमाचे आयोजक धनराजजी गुट्टे व गजाननजी आंधळे  यांच्यासह    प्रशासकीय अधिकारी, राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना राहुल भैया केंद्रे म्हणाले  की, मी ज्या तालुक्यांमध्ये  राजकारणात सक्रिय आहे तेथे आपला समाज बोटावरती मोजण्याएवढा असताना देखील माझ्या वडिलांना व मला गेली 40 वर्षापासून उदगीर तालुक्यातील जनतेने काम करण्यासाठी संधी दिली व  जाती पातीच्या पुढे जाऊन हे नेतृत्व मोठे केले आहे.  हा पुरस्कार  लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब व माझ्या तालुक्यातील तमाम जनतेला मी समर्पित करतो.
आज आपल्या समाजाला शैक्षणिक आरक्षण वाढवून मिळण्याची गरज आहे.

 प्रामाणिक व कष्ट करणारा समाज म्हणून वंजारी समाजाची ओळख राहिलेली आहे.
 भविष्यामध्ये  शिक्षणाच्या माध्यमातून मागासलेपणा  दूर करण्याची गरज आहे.तसेच बॅक टू ओबीसी जाण्याची गरज आहे.
 मुंडे साहेबांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने  आज राज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये वंजारी समाज ने यश मिळवलेले आहे.
मला सर्वात कमी वयाचा  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष  करून माझ्या पक्षाने माझ्यासह   माझ्या समाजाचाही सन्मान केला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये या सर्व गोष्टी चे भान ठेऊन आणखीन व्यापक स्वरूपामध्ये समाजासह प्रत्येक जाती धातील लोकांची अविरत पणे सेवा करणार असून समाजाने केलेला हा सन्मान जिद्दीने काम करण्यासाठी ऊर्जा देत राहील. असे मत यावेळी राहुल केंद्रे यांनी मांडले.