मुंबई, कांदिवली:
      दिनांक  18/07/2021 रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे  कांदिवली वाहतूक चौकी समोरील रस्त्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत होते. दरम्यान रात्री 02ः22 वाजता कांदिवली वाहतुक चौकीसमोर एक इसम त्याच्या 8 ते 9 वर्षे लहान मुलीला पाण्यातून घेवून जात असताना पाण्याच्या प्रवाहात फुटपाथला अडखळून तोल जाऊन मुलीसह पाण्यात पडला. सदर घटना वाहतूक चौकीत रात्रपाळीस वायरलेस ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक  970936 नाव: राजेंद्र विठोबा शेगर यांनी पाहिली व क्षणाचाही विलंब न करता तत्परता दाखवून पाण्यात पडलेल्या इसमास व त्याच्या मुलीला सुखरुप प्रवाहातून बाहेर काढले व सुरक्षित ठिकाणी पोचवले.

    सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे वाहतूक पोलीस विभागाकडून अभिनंदन करण्यात आले आहे. अशी माहिती बाळासाहेब बनकर,
प्रभारी पोलीस निरीक्षक,
कांदिवली वाहतूक विभाग यांनी दिली आहे.