प्रतिनिधी, २ जानेवारी २०२१ :- मुंबईच्या मढ मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मढ जेटी लगत असलेल्या खारकुटी वृक्षाला तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

   घटनास्थळी मालवणी पोलिस दाखल झाले असून या तरुणांचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. गळफास घेणाऱ्या तरुणाचे वय अंदाजे २५ ते २७ असून तरुणाचा मृतदेह झाडावरून खाली उतरवत शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या मृतक तरुणाचं नाव विकास डूग्लज असून सकाळी कामाला जातो असं सांगून तो घरातून निघाला होता. 

     विकास रोज सकाळी चार वाजता हाउसकीपिंग च्या कामाला जात असे. या सर्व घटनेचा तपास बैनवाड पोलिस निरीक्षक,पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत. विकास हा मढ येथील साईनाथ सोसायटीतील रहिवाशी होता.