प्रतिनिधी,२२ जानेवारी २०२२ :- २२ जानेवारी रोजी आशा अशोक शेटे वय ६४ राहणार पनवेल,जिल्हा रायगड यांचा मृत्यू देह महाड येथील वीरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस तळ्यामध्ये सापडला. वरील मृत महिला ही कॅन्सर या आजाराने ग्रस्त असल्यामुळे तिने तळ्याच्या पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

     सदरचा मृतदेह साळुंखे रेस्क्यू टीम यांनी पाण्याबाहेर काढला असता त्या मृतदेहाला महाड उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. सदरच्या मृत्यूची नोंद महाड शहर पोलीस स्टेशन येथे आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असून त्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गुरव हे करीत आहेत.