उदगीर प्रतिनिधी -

 आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशभर राबविण्याचे ठरवले असून दिनांक दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्वांनी विविध उपक्रम राबवून हा आजादी का अमृतमहोत्सव ऐतिहासिक बनवावा व संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा उत्साहात हे वर्ष साजरे करावे असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले आहे.

 भारतीय स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारक, थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, देशभक्त, स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेल्या भारतीय वीरांचे स्मरण करून विविध उपक्रम राबवून आपण हा आजादी का अमृत महोत्सव ऐतिहासिक बनवूया असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले.
 याकरिता दिनांक दोन ऑगस्ट ते 15 ऑगस्ट प्रत्येकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून हर घर तिरंगा
 घर घर तिरंगा या अभियानात सामील व्हावे.
 राष्ट्र प्रथम आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला आपल्या देशाचा सर्वोच्च अभिमान आहे, सर्व जातिभेद, पंथभेद, पक्षभेद  विसरून सर्व नागरिकांनी  प्रथमता आणि अंतिमतः मी भारतीय आहे, आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणे हे माझे कर्तव्य आहे असे समजून हा आजादी का अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा. याकरिता तरुणांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून मोहीम राबवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले.

 शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी  देशभक्तीपर वकृत्व स्पर्धांचे आयोजन, क्रीडा स्पर्धांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले पाहिजे असे सांगितले. महिलांनी सुद्धा मोठया प्रमाणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे व आजादी का अमृत महोत्सव साजरा करावा.ग्रामीण भागात आपल्या भागातील देशसेवा करत असलेले फौजी, यांनी उपस्थित असतील तर त्यांचा  किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करून त्यांच्या कुटुंबातील सदस्य देश सेवा करत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी.
 शिक्षकांनी आपल्या मुलांना देशसेवेसाठी प्रेरित करण्याची विविध उपक्रम राबवावेत.

जिल्हा प्रतिनिधी
 नागनाथ ससाणे
 लातूर