जळकोट प्रतिनिधी
अखेर जळकोट तालुक्याला वीज मंडळाच्या महावितरण कंपनीचे नवनिर्मित उपविभागीय कार्यालयाला मंजुरी मिळाली असून माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश. 24 वर्षापासून ची प्रलंबित असलेली मागणी सततच्या पाठपुरावामुळे मंजूर झाले असल्याची माहिती माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली. त्यामुळे जळकोट तालुक्यात सर्वत्र जल्लोष आनंद उत्सव व फटाक्याचे आतिश बाजी करून आनंद साजरा करण्यात आला.26 जून 1999 ला जळकोट तालुक्याची निर्मिती झाली तेव्हापासून आज तायगत या तालुक्याला वीज वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय नसल्याने नवीन मीटर घेणे शेतीपंपाचे कनेक्शन घेणे नवीन डिमांड भरणे बिलाची दुरुस्ती करणे व लहानपण गोष्टीसाठी 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरूर ताजबंद येथील वीज वितरण च्या उपविभागीय कार्यालयात जाऊन लोकांना चकरा माराव लागत होते. 24 वर्षापासून अनेकदा अर्ज विनंती करून आंदोलन करूनही याची कोणी दखल घेत नव्हते जळकोट तालुक्याचा शेवटचा भाग हातनूर गव्हाण येथून 50 किमी अंतरावर हे उपविभागी कारले होते लोकांची वेळ पैसा वाया जात होता व लोकांची मागणी लक्षात घेऊन या विभागाचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी मुंबई येथील वीज वितरण चे मुख्य कार्यालय प्रकाश गड येथे सतत पाठपुरावा करून सदरचे नवनिर्मित उपविभागीय कार्याला मंजुरी मिळून घेतली. उदगीर, चाकूर, अहमदपूर या तीन तालुक्यातील गावाचे विभाजन करून नव्याने जळकोट उपविभागाची निर्मिती करण्यात आली. यामध्ये जळकोट शाखा ,हाडोळती शाखा, नळगीर ग्रामीण शाखा या तीन शाखेचा समावेश करण्यात आला. असून या कार्यालयासाठी एकूण 12 पदे निर्माण करण्यात आली आहेत .त्यामध्ये उपविभाग कार्यालय प्रमुख यात उपकार्यकारी अभियंता वितरण एक पद कनिष्ठ अभियंता वितरण एक पद तांत्रिक विभाग आस्थापना विभाग निम्नस्तर लिपिक एक पद वित्त व लेखा विभाग उच्च स्तर लिपिक लेखा एक पद निम्नस्तर लिपिक एक पद गुणवत्ता नियंत्रण विभाग सहाय्यक अभियंता वितरण एक पद मुख्यतंत्रज्ञ एक पद शिपाई एक पद असे आस्थापनेने पद निर्माण केले गेले आहेत .महाराष्ट्र शासनाच्या कार्यालय आदेश क्रमांक 32 69 व तसेच सत्तावीस ऑब्लिक 2022 दिनांक 21 डिसेंबर रोजी सदरच्या नवनिर्मित उपविभागी कार्यालयाला कार्यकारी संचालकाच्या स्वाक्षरीने मंजुरी देण्यात आली. लवकरच हे कार्यालय सुरू करण्यात येईल असे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे व कार्यकारी अभियंता सयास दराडे यांनी ही माहिती दिली. या कार्यावर सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले जळकोट तालुक्याचे वीज मंडळाचे हे नवनिर्मित उपविभागीय कार्यालय मंजूर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे नगराध्यक्ष सौ प्रभावती कांबळे ,उपनगराध्यक्ष मनमत किडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशोक डांगे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनमत बोधले, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते तात्या पाटील नगरसेवक संदीप डांगे ,अजिस मोमीन ,गोविंद ब्रम्हणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय ब्राह्मणा खादरभाई लाटवाले ,नगरसेवक गोपाळ कृष्ण गबाळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, दिलीप कांबळे, संग्राम पाटील हासुळे, जि प सदस्य चंदन पाटील ,नागरगोजे शिवानंद देशमुख, माधव तिलमिलदार सरपंच, संघटनेचे अध्यक्ष मेहता बॅग शिरीष चव्हाण बालाजी आगलावे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष सत्यवान पाटील दळवे स्वच्छता सभापती बाबू मिया लाटवाले महिला बालकल्याण सभापती सुरेखा गवळे काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धूळ शेटे शिक्षण सभापती संग्राम नामवाड नगरसेवक विनायक डांगे व संख्या शेतकऱ्यांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला व आमदार बनसोडे व महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार व्यक्त केले सदरच्या कार्यालयामुळे आता शेतकऱ्यांची अडचण होणार नाही 50 किलोमीटर आंतर जाण्याची गरज नाही सर्व कामे , शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या अडचणी दूर होतील
लातूर:अखेर जळकोट तालुक्याला वीज वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालयाला मंजुरी

Source:
Post Comment